" आत्मविश्वासाची जाणीव "
विश्वनाथ पाटील सरांशी बोलल्यानंतर आत्मविश्वासात नेहमीच वाढ होते. आपणही काहीतरी करू शकतो याची खात्री पटते. माझ्या तयारी दरम्यान पाटील सरांनी केलेले मार्गदर्शन मला खूपच उपयुक्त ठरले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता आले.
– प्रशांत ढोले (डी. वाय. एस. पी.)
" नवी उमेद "
" पृथ्वी अकॅडमी " चे विश्वनाथ पाटील सर हे माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी व आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे . स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अपयशामुळे जेव्हा जेव्हा खचल्यासारखे वाटले तेव्हा पाटील सरांनीच नव्या उमेदीचा मंत्र दिला. त्याचा जप करीतच मी आज या पदावर पोहचलो आहे.
– मिनल कांबळे (IRS)
" योग्य मार्गदर्शन "
नोकरीसोबत अभ्यास करीत असल्याने मला नियमित क्लास करता आला नाही. परंतु पृथ्वी अकॅडमी मधील पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज मात्र मी अत्यंत नियमितपणे सोडविल्या. त्याचा मला तयारीत सुधारणा करण्यासाठी खूप फायदा झाला. मुलाखतीच्या तयारीसाठी विश्वनाथ पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले.
– पूनम पाटील (डी. वाय. एस. पी.)
" योग्य मार्गदर्शन "
बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत "पृथ्वी अकॅडमी " मधील विकेण्ड बॅच मी जॉईन केली. आधीच्या प्रयत्नात अपयश आल्यावर पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा जिद्दीने तयारी केली. ' पृथ्वी अकॅडमी 'तील योग्य मार्गदर्शन आणि पाटील सरांनी दाखवलेली दिशा यामुळेच एम. पी. एस. सी. त यशस्वी होऊ शकले.
– प्रियांका मानकर ( नायब तहसिलदार )
" दर्जेदार टेस्ट सिरीज "
एम. पी. एस. सी. ची तयारी करताना सराव चाचण्या सोडविणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ' पृथ्वी अकॅडमी ' च्या टेस्ट सिरीज आयोगाच्या दर्जाच्या असतात. या टेस्ट सिरीजमुळेच मुख्य परीक्षेत माझे ४० ते ५० गुण वाढले. मुलाखतीच्या तयारीसाठीही विश्वनाथ पाटील सरांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
– भूषण अहिरे ( उपजिल्हाधिकारी )
" यशाचा मार्ग "
आधीच्या वर्षी तयारीसाठी येऊन गेलेला विद्यार्थी बारकाव्यासहीत लक्ष्यात ठेवण्याचे पाटील सरांचे कसब आश्चर्यकारक आहे. माझ्या तयारी दरम्यान सरांनी जे - जे सांगितले ते - ते सर्व केले आणि मी यशस्वी झालो. सांगितलेल्या मार्गावर पावले टाकल्यानेच मला हे यश मिळाले.
– संदीप मिटके ( डी. वाय. एस. पी.)
" Unconditional Help & Guidance "
I am glad to tell you that I have qualified Civil Services Exam with All India 68 Rank. Thank you PRITHVI Academy. You have been inspiration to me since my college days. During my preparation you helped me in Geography, Answer writing and Interview. The best part in my life with you is unconditional help and guidance from you regarding any matter.
– Kapil Shirsat ( IAS )
" दृष्टिकोन "
स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन मी विश्वनाथ पाटील सरांकडून शिकलो. विविध संकल्पना खूप सोप्या शब्दांत त्यांनी स्पष्ट केल्या. मुख्य म्हणजे उत्तर लिहिताना नेमकेपणा आणण्याचे तंत्र, त्यासाठी आकृत्या व नकाशांचा योग्य वापर हे मी 'पृथ्वी अकॅडमी' मध्येच शिकलो.
– विजय कुलांगे ( IAS )
" Conceptual Clarity "
I gained conceptual clarity and exam oriented approach at PRITHVI Academy. I owe success to your guidance I thank you sir for your support and guidance at each stage of my preparation.
– Prashant Patil ( IAS)
.
यश मिळविणे म्हंटल की कसोटीला उतरणं आलंच. UPSC परीक्षा याला अपवाद नाही. कल्पनेचं रूपांतर वास्तवात करण्यासाठी उरात उर्मी आणि अंगात धमक असावी लागते. इथं प्रश्न असतो तो दुर्दम्य इच्छाशक्तीचा, अढळ आत्मविश्वासाचा, अविरत कष्टाचा आणि सुयोग्य मार्गदर्शनाचा ! या प्रश्नाचे उत्तर म्हणजे विश्वनाथ पाटील सर आणि 'पृथ्वी अकॅडमी'.
– श्रीधर पाटील ( IAS )
" Right Guidance "
I took my initial footsteps in the preparation of Civil Services Examination with Vishwanath Patil Sir and PRITHVI Academy. Right efforts with right guidance have been transform into my today's success.
– Manoj Chothe ( IPS )